पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव .

गोदाम गल्ली ,भाजी मार्केट ,दत्त बेकरी शेजारी ,कोपरगाव. ता:कोपरगाव. जि:अहमदनगर.

About Us

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,कोपरगाव

२०/०९/१९९० रोजी संस्थेचे संस्थापक श्री. नितीनराव औताडे यांनी केवळ रु. ३६.३००/- रुपये भागभांडवलावर एका छोट्याशा इमारतीमध्ये संस्थेच्या कार्याला सुरवात केली. संस्थेची कार्य पद्धती , व्यवहारातील पारदर्शिता व लोक सहभाग या तिन्ही गोष्टीच्या जोरावर संस्था अल्पावधीत नावारूपाला आली. १९९० साली संस्थेकडे रु. 2,८९,९८९ /- च्या ठेवी होत्या त्या पाच वर्षात मार्च १९९५ अखेर रु. ६,६७,८९४ /- वर जाऊन पोहोचल्या.

पोहेगाव व परिसरातील व्यापारी वर्ग व खास करून उवा वर्ग संस्थेच्या कार्यापाधातीमुळे संस्थेकडे आकर्षीत झाला. कर्ज पुरवठ्यामुळे अनेकांना आपले नवीन व्यवसाय येशस्वीरीत्या उभे करता आले. अनेकांचा भांडवलाचा प्रेश्न निकाली निघाला युवकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या. संस्थेच्या रोज वाढत्या कामाबरोबर संस्थेची व्याप्ती वाढविण्याची गरज लक्ष्यात घेऊन दि. ३१/०१/१९९८ रोजी शिर्डी व त्यानंतर दि.३०/१२/२००२ कोपरगाव शहर येथे शाखा स्थापन करण्यात आल्या दोन्ही शाखांचा व्यवहार हा संस्थेच्या नावलौकिकास साजेसा चालू आहे. संस्थेमध्ये

मोफत नेत्र तपासणी शिबीर,इंग्लिश स्पिकिंग कोर्स, रक्तदान शिबीर असे अनेक उपक्रम विनामूल्य राबावून संस्थेने समाजामध्ये सामाजिक बांधिलकीचा नवा पायंडा घालून दिला आहे. संस्थेच्या संचालक मंडळाची दरमहा होणारी बैठक संस्थेच्या चालू कामाचा आढावा उपयुक्त ठरते व त्या अनुशंगाने येणाऱ्या सूचना त्वरित मार्गी लावल्या जातात. संस्थेची दरवर्षी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीच उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडते. जुलै २०१८ अखेर 75,28,24,080 /- ठेवींचा जादुई आकडा पार केला आहे.